
Ratnagiri |डोंगरावर झोपडी बांधून कोकणची कन्या करतेय ऑनलाइन पशुवैद्यकीय पदवीचा अभ्यास! स्पेशल रिपोर्ट
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील दारिस्ते या दुर्गम भागात राहणारी स्वप्नाली या तरुणीने गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नसतानाही जिद्द, चिकाटी व मेहनत घेत करतेय पशुवैद्यकीय पदवीचा तिसऱ्या वर्षांचा ऑनलाइन अभ्यास. उराशी काहीतरी करण्याची जिद्द असेल तर कितीही आणि कोणतेही अडथळे आले तरी पार करून आपलं ध्येय साध्य करू शकतो, याची प्रेरणादायी गोष्ट आहे स्वप्नाली सुतार हिची. कोकण म्हटल की डोंगर, दऱ्या खोऱ्याचा भाग, त्यामुळे अनेक ठिकाणी नेटवर्कही मिळत नाही. लॉकडाऊन झाल्यावर काही दिवसांनी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू झाला. मात्र आपल्या भावांसोबत गावी आलेल्या स्वप्नाली कणकवली तालुक्यातील दारिस्ते गावातील सुतारवाडीत गावी आली. मात्र अभ्यासक्रम ऑनलाइन सुरू झाल्याने तिला तिच्या गावात इंटरनेटची सेवा मिळत नसल्यामुळे सध्या ही तरुणी जंगलात भर पावसात झोपडीत दिवसभर अभ्यास करते. या तिच्या जिद्दीला सलाम.