Bodyguards | लॉकडाऊनमध्ये आम्ही संसार कसा चालवायचा? शिक्षण संस्थांवरील 170 सुरक्षारक्षक पगाराविना
महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाच्या 170 सुरक्षा रक्षकांना तब्बल 18 महिने पगार देण्यात आलेला नाही. महाराष्ट्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कौशल्य विकास या ठिकाणी हे सुरक्षा रक्षक सेवा बजावत आहेत. मुंबई, रायगड पालघर-ठाणे या चार जिल्ह्यातील 170 विनापगारी काम करत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. जगावं की मरावं असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. राज्य शासनाने आमच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी विनंती देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. या सुरक्षारक्षकांसोबत बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी रणजीत माजगावकर यांनी.