BMC Financial Crisis | कोरोनामुळे बीएमसीचं कंबरडं मोडलं, प्रथमच बँकेतील ठेवी काढाव्या लागणार
मुंबई : कोरोना संकटामुळे देशातील सर्वाधिक श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचं कंबरडं मोडलं आहे. कोरोनाचे संकट निवारण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च करावे लागत असताना दुसरीकडे महसुलाद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातही प्रचंड तूट निर्माण झाली आहे. परिणामी मुंबई महापालिकेला पहिल्यांदाच बँकेत असलेल्या ठेवींना हात घालावा लागत आहे.