Black Panther | सिंधुदुर्गच्या आंबोली घाटात सात वर्षांनंतर काळा बिबट्या आढळला
Continues below advertisement
सिंधुदुर्गातील आंबोली घाटात पूर्वीचा वस परिसरात काळ्या बिबट्याचे दर्शन सुमारे ७ वर्षानंतर घाट परिसरातुन जाणाऱ्या प्रवाशांना रात्रीच्या वेळी पूर्वीचा वस येथे रस्त्याशेजारी उभा असलेला हा काळा बिबटा दिसला. वन्यप्राणी गणनेतही आंबोली परिसरात ब्लॅक पँथरचे अस्तित्व दिसून आले आहे. आंबोली, तिलारी व पश्चिम घाट परिसरात काही ठिकाणी या काळ्या बिबट्यांचा वावर आहे. काळा बिबट्या ही वेगळी जात नसून मार्जार कुळातील बिबट्याचाच हा प्रकार आहे. कातडीच्या रंगामुळे त्याच्या अंगावरचे ठिपके लपतात. वाघांमध्ये पांढरा वाघ जसा दुर्मिळ, तसाच बिबट्यात काळा बिबट्याही दुर्मिळ आहे. त्याच्या कातडीचा रंग त्वचेतील "मेलनिन' या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. या द्रव्याचे प्रमाण जास्त झाल्यास कातडी काळी किंवा गडद रंगाची होते.
Continues below advertisement