भाजपच्या पाठिंब्यामुळे कंगना काहीही बरळते, भाजपने माफी मागावी, काँग्रेस नेते सचिन सावंत यांची मागणी
Continues below advertisement
कंगना विरूद्ध बीएमसी या वादात आता कंगनानं मुंबई महानगरपालिकेवर पक्षपाती पणाचाही आरोप केला आहे. ज्या दिवशी पालिकेनं बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावली होती. त्याचवेळी शेजारीच असलेल्या प्रसिद्ध फॅशन डीझायनर मनिष मल्होत्रालाही नोटीस बजावली होती. मात्र, त्याला पालिकेनं 7 दिवसांची मुदत दिली. मात्र, आपल्याला केवळ 24 तासांची मुदत दिली गेली, असं का? हा सवाल उपस्थित करताना कंगनानं बेकायदेशीर बांधकामाबाबत पालिकेनं केलेला आरोप फेटाळून लावला आहे. आपण आपल्या कार्यालयात कोणतंही बेकायदेशीर बांधकाम केलेलं नसून आपण शिवसेनेबाबत केलेल्या विधानांमुळेच पालिकेनं निव्वळ आकसापोटी ही कारवाई केल्याचं कंगनानं आपल्या उत्तरात म्हटलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Kangana In Mumbai Kangna On Mumbai Kangna Kangana Ranot Mumbaikar Kangna Ranaut Aamchi Mumbai Kangana Ranaut BJP