BJP Protests against Munde | भाजपचं धनंजय मुंडेंविरोधात आंदोलन,मुंडेंनी राजीनामा द्यावा,भाजपची मागणी
भाजपच्या वतीनं आज राज्यात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंविरोधात आंदोलन करण्यात आलं. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपच्यावतीनं करण्यात आली आहे. संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत एफआयआर दाखल झालेली नाही. त्यात अनेक बाबी संशयास्पद आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपच्यावतीनं करण्यात आली आहे.