#Lockdown राज्यातला लॉकडाऊन उठवा,व्यवहार पूर्ववत करण्याची भाजप खासदार विनय सहस्त्रबुद्धेंची मागणी
भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी राज्य सरकारला महाराष्ट्रात जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन परत घेण्याची विनंती केली आहे, त्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. ते म्हणाले की, याचा परिणाम गरीब व मध्यम वर्गावर होत असून लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसायांवर परिणाम होत आहे, तसेच त्यांनी नियमांचे पालन करून व्यायामशाळा, मंदिरे आणि उद्याने उघडण्याची विनंती केली.