भाजप आमदाराचे हातपाय तोडण्याची भावना गवळींची धमकी, आरोप सिद्ध करून दाखवा, भावना गवळींचं आव्हान

वाशिम शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आणि भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात झालेल्या वादाला समृद्धी महामार्गाची किनार आहे का असा प्रश्न सध्या उपस्थीत होत आहे, कारण खासदार भावना गवळी यांची ठेकेदाराला काम न करण्याची धमकी दिल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे हा वाद आता कोणत्या टोकाला जाईल हाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे. खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात विकासाच्या मुद्द्यावर खडाजंगी झाल्याचं सांगत असले तरी कारण मात्र वेगळंच आहे हे या आजच्या ऑडिओ क्लिप वरून सध्या तरी दिसते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola