BJP MLA Positive | भाजप आमदार देवयानी फरांदेंचा निष्काळजीपणा, टेस्ट केली असतानाही बैठकीत हजेरी?
नाशिकमध्ये कोरोनाचा कहर सुरुच असून आज नाशिक मध्य मतदारसंघाच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. फेसबुकवर देखिल याबाबत त्यांनी पोस्ट करत मुंबई अधिवेशन तसेच जळगाव येथे प्रवास केल्याने खबरदारी म्हणून टेस्ट केली असता ती पॉझिटीव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी असं आवाहन केलंय धक्कादायक म्हणजे आज दुपारीच त्यांनी नाशिकमधील एका लॉन्सवर आयोजित सकल मराठा समाजाच्या बैठकीत हजेरी लावली होती तसेच त्यांच्या भाषणावेळी गोंधळ देखिल उडाला होता आणि याचवेळी त्यांनी मास्क देखिल लावला नसल्याचं समोर आलं.
Tags :
Devayani Farande Maratha Aarakshan New Delhi State Government Maratha Reservation In Maharashtra Supreme Court SEBC Act Maratha Reservation LIVE Maratha Reservation