भाजप आमदार आशिष शेलार यांना धमकीचे कॉल्स, आशिष शेलारांकडून पोलिसात तक्रार दाखल, दोघांना अटक
भाजपाचे नेते आणि आमदार अॅड. आशिष शेलार यांना धमकीचे फोन येत आहेत. यासंदर्भातली तक्रार आशिष शेलार यांनी दिलीय आणि याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. पुढील तपास वांद्रे पोलीस करत आहेत. काल मध्यरात्री शेलार यांना 8 ते 10 धमकीचे कॉल्स आलं होते. यात त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर शेलारांनी तक्रार नोंदवली आणि याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय.