राज्यपालांकडे जाणं हा महाराष्ट्राचा अपमान संजय राऊतांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्यांचा हल्लाबोल

Continues below advertisement

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोग म्हणजे भाजपची एक शाखा असल्याची टीका केलीय. बिहार निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार राऊत यांनी ही टीका केली आहे. बिहार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाकडून बिहार मधील नागरिकांना मोफत लस देण्याचे आश्वासन देण्यात आले. भाजपच्या या आश्वासनाच्या विरोधात विरोधकांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती आणि भाजप वर कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली आणि भारतीय जनता पक्षाने दिलेले मोफत आश्वासन हे आयडियल कोड ऑफ कण्डक्टचे उल्लंघन नसल्याचं म्हटलं. यावरती प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोग म्हणजे भाजपची एक शाखा असल्याचं म्हटलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram