नंदुरबारमध्ये Bird Flu चा संसर्ग वाढला, आणखी चार पोल्ट्रीतील कोंबड्यांना 'बर्ड फ्लू'ची लागण
नवापुर तालुक्यातील ४ पोल्ट्रीचे अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्याने सोमवारी पुन्हा सहयोग, शिष, पालावाला न्यु डायमंड या चार पोल्ट्री चे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.नवापूर शहरात बर्ड फ्ल्यूचे थैमान दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे.नवापूर तालुक्यात एकूण 27 पोल्ट्री फार्म असून १० लाख पक्षी आहेत त्यातून एक लाख कुकुट पक्षी नष्ट करण्यात आली आहे.पहिल्या दिवशी चार पोल्ट्रीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नवापूर शहरातील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि कुक्कुटपालनाचे व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडवणारे आहे त्यानंतर रविवारी पाच पोल्ट्री मधील कुक्कुट पक्षी चे अहवाल भोपाल व पुणे येथे पाठवण्यात आले होते.त्यातील चार पोल्ट्री फार्मचे बर्ड फ्ल्यू अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.