Bird Flu In Maharashtra | सांगलीत बर्ड फ्लू नसतानाही अंड्याचे दर घसरले
सांगली : महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एकाही पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळला नाही. ज्या पक्ष्यांत बर्ड फ्लू आढळतोय त्यात रानटी पक्षी आणि देशी कोंबड्याचा समावेश आहे. असे असताना मात्र बर्ड फ्लूमुळे मोठा तोटा पोल्ट्री धारकांना सहन करावा लागतोय. पुरेशी खबरदारी, कोंबड्यांना वेळोवेळी इंजेक्शन देण्याचा एकीकडे मोठा खर्च करावा लागत असताना दुसरीकडे अंड्याचे दर घसरल्याने मोठा आर्थिक तोटा पोल्ट्री धारकांना सहन करावा लागतोय. तर पोल्ट्री फॉर्मवर मोठ्या संख्येने अंडी विक्रीविना पडून राहत आहेत. तर अंड्याचे दर देखील 5 रुपयांवरून 3रुपयांवर आले आहेत.