
BIG THREE NEWS : कामाच्या तीन महत्वाच्या बातम्या ABP MAJHA
रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर झालं असून यांत व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. रेपो रेट ४ टक्के तर रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्के राहणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी केलीय. कोरोना संकटामुळे सलग नवव्यांदा व्याजदर स्थिर ठेवण्यात आलेत. त्यामुळे आपल्या खिशावर कोणताही ताण पडणार नाहीये. दुसरी बातमी थेट जेवणाच्या ताटाशी निगडीत आहे. थंडीचं आगमन झाल्यानं अड्यांच्या दरांनी अचानक उंची गाठलेय. थंडीमुळे अंड्यांचा दर डझनामागे जवळपास १२ रुपयांनी वाढलाय. किरकोळ बाजारात अड्यांची किमत ६६ वरून ७८ रुपयांवर पोहोचली आहे. तर तिसरी बातमी आपल्या आरोग्याशी संंबंधित आता नीडल फ्री अर्थात सुईशिवाय कोरोनाची लस मिळणार आहे. नीडल फ्री लसीकरणासाठी नाशिक आणि जळगाव जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. सुरुवातीला 'झायकोव -डी' या लशीचे नीडल फ्री डोस नाशिक आणि जळगावातल्या ८ लाख जणांना देण्यात येणार आहेत. २८ दिवसांच्या अंतरानं ३ डोस दिले जातील आणि त्यानंतर पुढील निर्णय होणार आहे.