Latur News | लातूरमधील कोळनुरात प्रशासक पदासाठी लागली बोली
लातूर : राज्य सरकारने एखादा घटनाबाह्य निर्णय घेतला तर त्याचे किती दूरगामी परिणाम होऊ शकतात याचा एक मोठं उदाहरण लातूर जिल्ह्यात समोर आलं आहे.
लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यात कोळनूर नावाचं गाव आहे. गावची लोकसंख्या साडेतीन हजार. मतदार आहेत 1350. या गावच्या सरपंच पदाची मुदत संपलेली आहे. राज्य सरकारनं गावातूनच प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतल्यानंतर गावकऱ्यांनी प्रशासक कोण असावा यासाठी बोली लावली. गावांमध्ये गेल्या दोन महिन्यापासून खंडोबाच्या मंदिराचं काम सुरू आहे. तीस बाय 45 मीटर लांबी रुंदीच्या या मंदिराच्या बांधकामासाठी जो कोणी पैसे देईल. त्याची गावकऱ्यांच्या वतीने प्रशासक म्हणून पालक मंत्र्यांकडे शिफारस होणार आहे.
गावांमध्ये 15 जुलैला सकाळी दहाच्या सुमाराला बोली लावण्यासाठी ग्रामस्थ एकत्रित जमा झाले. गावचे माजी सरपंच आणि तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जनार्दन चोले यांनी बोली लावायला पुढाकार घेतला. वीस हजार, पन्नास हजार, 70 हजार एक लाख असं करत अंतिमतः प्रशासक पदाची बोली दीड लाखापर्यंत गेली.