Pandharpur Kartiki Ekadashi | कार्तिकी एकादशीसाठी वर्धा जिल्ह्यातील कवडूजी भोईर यंदाचे मानाचे वारकरी

Continues below advertisement
पंढरपूर : उद्या पहाटे होणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी अतिशय मोजक्या लोकांना प्रवेश दिला जाणार असून पूजेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कुटुंबीय यांच्यासह मानाचे वारकरी दाम्पत्य आणि केवळ मोजके अधिकारी व पालकमंत्री कुटुंब अशा 25 व्हीआयपींना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. उद्या पहाटे दोन वाजता अजित पवार सपत्नीक विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजेसाठी येतील. यावेळी मंदिरात पहाटे दोन ते अडीच वाजेपर्यंत विठुरायाची महापूजा होणार असून यानंतर दोन वाजून 55 मिनिटापर्यंत रुक्मिणी मातेची महापूजा होईल. यानंतर 3 वाजून 15 मिनिटापर्यंत उपमुख्यमंत्री व मानाचा वारकरी यांचा सत्कार मंदिर समितीच्या वतीने केला जाणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram