Bhayandar मध्ये शेकडो लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक, दीडशे लोकांना 10 कोटींचा चुना : ABP Majha

Continues below advertisement

शेअर्समध्ये चांगल्या परताव्याचं आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या दोन ठगांना भाईंदरमध्ये अटक करण्यात आलीय. त्यांनी दीडशे लोकांची अंदाजे १० कोटी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आलीय. हा आकडा ५० कोटी रुपयांपर्यंतही जाऊ शकतो, असा पोलिसांचा अंदाज आहे. एक लाख रुपये गुंतवल्यास दरमहिना ५ हजार रुपये परतावा देऊन मूळ रक्कम कधीही काढता येईल अशी योजना हे दोघेजण राबवत होते. अण्णा अमृते आणि कुलदीप रुंगटा अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. त्यांनी बँका, सरकारी आणि खासगी कर्मचारी, एसटी महामंडळाचे कर्मचारी यांना आपलं लक्ष्य ठेवलं होतं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram