Sheetal Amte Suicide : शीतल आमटेंचं जाणं अत्यंत वेदनादायी, भाऊसाहेब चासकर यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement
मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आज (30 नोव्हेंबर)आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विषाचं इंजेक्शन घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु, डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येमुळे सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram