Bhaskar Jadhav Speech : शेवटी आपण मराठीच! मनसेच्या मंचावर भास्कर जाधव यांचं दमदार भाषण ABP MAJHA
रत्नागिरीच्या गुहागरमध्ये आयोजित 'एक समाज एक संघ' या क्रिकेट सामन्यांच्या कार्यक्रमात एकत्र आलेल्या नेत्यांनी राजकीय भिन्नता बाजूला ठेवून एकोप्याचा संदेश दिला. यावेळी प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) आमदार भास्कर जाधव आणि मनसेचे नेते प्रमोद गांधी मंचावर एकत्र पाहायला मिळाले.
कार्यक्रमाच्या दरम्यान भास्कर जाधव यांच्या सत्कारावेळी प्रमोद गांधी यांनी स्वतःच्या हाताने मनसेची छत्री जाधव यांच्या डोक्यावर धरली. यावर जाधवांनी मिश्किलपणे प्रतिक्रिया सुद्धा दिली.
या कार्यक्रमात विविध संघांनी सहभाग घेतला होता आणि स्थानिक नागरिकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. एकत्रितपणे हा कार्यक्रम कोणत्याही राजकीय प्रचाराशिवाय, सामाजिक सलोखा आणि क्रीडा विकासाच्या उद्देशाने पार पडला, हे विशेष!