Bhandara : रामनवमीनिमित्त भंडाऱ्याच्या अड्याळमधील घोडा यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात
Continues below advertisement
रामनवमीनिमित्त भंडाऱ्याच्या पवनीतील अड्याळमधील घोडा यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे... मध्यरात्री पुजेनंतर श्रीहरी बालाजी महाराजांची लाकडी मूर्ती चार अंगरक्षकासह लाकडी घोड्याच्या रथावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली... जगन्नाथपुरी प्रमाणे अड्याळ इथही हाताने रथ ओढण्याची परंपरा आहे. १५० वर्षांपासून लाकडी रथ ओढण्याची प्रथा आहे.. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह लगतच्या मध्यप्रदेश, छतीसगड राज्यातून मोठ्या संख्येने भाविक अड्याळमध्ये दाखल झाले होते... हनुमान जयंतीपर्यंत हा घोडारथ भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे.
Continues below advertisement