Bhandara : प्रत्येक होर्डिंगवर 'क्यूआर कोड' बंधनकारक, होर्डिंगवर क्यूआर कोड नसल्यास कारवाई होणार

नगर पालिका क्षेत्रात आपण होर्डिंग लावत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी.... होर्डिंग किंवा बॅनरला क्यूआर कोड लावला नसेल तर तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागेल.... भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यासंदर्भातला आदेश काढलाय... नगर पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शुभेच्छा किंवा जाहिरातीचे होर्डिंग लावले जातात यामुळं शहरातील सार्वजनिक मालमत्तेचं विद्रुपीकरण होत असल्याची ओरड नागरिकांकडून होतेय..दरम्यान आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशा बॅनर आणि होर्डिंगवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे आता यापुढे शहरात कुठेही होर्डिंग लावायचे असल्यास होर्डिंगवर नगर परिषदेकडून क्यूआर कोड बंधनकारक आहे...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola