Gosekhurd Dam : गोसीखुर्द धरणाचे 21 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Continues below advertisement
तर तिकडे भंडाऱ्याचं गोसीखुर्द धरणाचे २१ दरवाजे उघडण्यात आलेत. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्यात. गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असून, २१ दरवाजांमधून ८१ हजार ६२० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. दरम्यान, काल रात्रीपर्यंत धरणाचे १७ दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र, पावसाचा वाढता जोर पाहता आणखी चार दरवाजे उघडण्यात आलेत. त्यामुळे, नदीच्या काठावरील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. आणि प्रशासनही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
Continues below advertisement