ABP News

First Home Voter Bhandara : साकोलीतील जैनबी कुरेशी ठरल्या पहिल्या गृह मतदार

Continues below advertisement

First Home Voter Bhandara : साकोलीतील जैनबी कुरेशी ठरल्या पहिल्या गृह मतदार  दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक जे मतदान केंद्रापर्यंत मतदानासाठी जाण्यास असमर्थ आहेत, अशांसाठी निवडणूक आयोगानं यावर्षी गृह मतदानाची सोय केली आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील 98 वर्षीय जैनबी जब्बर कुरेशी या जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील पहिल्या गृह मतदार ठरल्या आहेत. मागील पाच वर्षात प्रकृती बरी राहत नसल्यानं त्यांनी मतदान केलं नव्हतं. मात्र, यावर्षी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान अधिकारी त्यांच्या घरी पोहचलेत आणि त्यांचं मतदान करून घेतलं. राज्यातील लोकसभेचं पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्व विदर्भात होत आहे. त्याअनुषंगानं भंडाऱ्यात 7 एप्रिलला झालेल्या गृह मतदान प्रक्रियेत जैनबी कुरेशी यांचं मतदान झालं. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram