Bhandara Elephant : भंडाऱ्यात 23 हत्तींचा कळप घालतोय हैदोस, ग्रामस्थांमध्ये दहशत ABP Majha

Continues below advertisement

गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातून आलेल्या 23 हत्तींच्या कळपाने भंडारा जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून मोठा उच्छाद मांडला आहे. ज्या परिसरात या हत्तींचे सध्या वास्तव्य आहे त्या भागातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरलेली आहे दरम्यान या हत्तींच्या काळपापासून ग्रामस्थांना सुरक्षित ठेवण्याचा वनाधिकारी पूर्ण प्रयत्न करीत असेल तरी, अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे या हत्तींनी मोठे नुकसान केलेले आहे. लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोहळी या गावालगत हत्तींचा कळप पोहचला असून त्याचा आढावा घेतला आहे, Abp माझा ने.

Vivo : या हत्तींच्या कळपात 23 छोट्या-मोठ्या हत्तींचा समावेश आहे. दिवसभर जंगलात वास्तव्य केल्यानंतर हा कळप सायंकाळी पाच वाजतानंतर पुढील मार्गक्रमण करीत असल्याचे मागील तीन दिवसांच्या त्यांच्या भंडारा जिल्ह्यातील वास्तव्यातून पुढे आले आहे. दरम्यान, या कळपाने त्यांच्या मार्गात येणाऱ्या शेतीतून मार्ग काढताना मग ती उसाची शेती असो की, धनाची त्यांची अक्षरश: नासाडी केल्याचे चित्र बघायला मिळत आहे. हत्तींच्या या उच्छादामुळे ग्रामीण नागरिकही मोठ्या प्रमाणात भयभीत झालेले आहेत. रात्रीच्या सुमारास रस्ते सूनासान होत असून ग्रामस्थही 7 च्या आत घरात असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे. दरम्यान, वनविभाग लाऊडस्पिकरच्या माध्यमातून ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यासाठी जनजागृती करीत आहेत. एखादे वाहन गावात पोहोचल्यावर भयभीत ग्रामस्थ त्या वाहनाभोवती जमा होऊन हत्तींची माहिती घेतात. या संपूर्ण प्रकरणाची थेट गावात जावून ग्रामस्थांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी, काय म्हणतात ग्रामस्थ जाणून घेऊया... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram