BHEL Project Bhandara : भेल प्रकल्प सुरू करा, अन्यथा जमिनी परत द्या; ग्रामस्थांची मागणी
BHEL Project Bhandara : भेल प्रकल्प सुरू करा, अन्यथा जमिनी परत द्या; ग्रामस्थांची मागणी भेल प्रकल्पाच्या नावानं राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रफुल पटेल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या दिग्गज नेत्यांनी अनेक निवडणुका लढवल्यात. भाषणातून भेल प्रकल्पाच्या मुद्द्यावरून वादावादी करीत एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडल्यात. मात्र, प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या शेकडो एकर शेतजमीनीवर अकरा वर्षानंतरही तिथं प्रकल्पाची निर्मिती झालेली नाही. एवढ्या वर्षानंतरही तिथं केवळ सुरक्षा भिंत आणि भेल प्रकल्पाचा फलक यापलीकडं काहीही दिसत नाही. भंडारा सारख्या मागास जिल्ह्यात एका राष्ट्रीय प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित करून सर्व सोपस्कार पार पडलेले असताना हा प्रकल्प केवळ राजकीय अनास्थेमुळं ११ वर्षापासून सुरुवात होण्यापूर्वीच बंद पडल्याचा लाजिरवाणा प्रकार आहे. यामुळं ज्या शेतकऱ्यांनी त्यांचं जीवनमान उंचावेल या अपेक्षेनं त्यांच्या शेती प्रकल्पासाठी विकल्यात. त्यांच्यावर मात्र, आता भूमीहीन होऊन कुटुंबाच्या पालन पोषणासाठी त्यांना गावातून इतरत्र जावे लागत आहेत. तर अनेकांना दोन वेळच्या पोटाची खडगी भागवण्यासाठी दुसऱ्यांकडं मोलमजुरी करावी लागत आहे. विवाहोत्सुक तरुणांकडं आता शेती नसल्यानं त्यांना विवाहासाठी मुली मिळत नसल्याचं वास्तव समोर आलं आहे. आता या ग्रामस्थांनी भेल प्रकल्प तात्काळ सुरू करावा अन्यथा त्यांची शेती परत करावी, या मागणीला घेवून उपोषणाचा इशारा प्रशासनाला दिला आहे. किमान प्रकल्प सुरू होत नाही, तोपर्यंत शेतीतून पिकं घेण्याचा संकल्प केला असून ५ जुलैपासून प्रकल्पाच्या गेट समोर ग्रामस्थ उपोषणाला बसत आहेत.