Gose Khurd धरणाचे 23 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले, नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Continues below advertisement
गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रीपासून जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे. त्यामुळं धरणाचे २३ दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आलेत. यातून ८९ हजार ४२४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येेतोय. मुसळधार पावसामुळे पवनी तालुक्यातील सोमनाळा - कोंढा या मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसंच आता पुन्हा सातत्यानं पाऊस पडत असल्यानं गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून टप्प्याटप्प्यानं पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्यानं नागरिकांना सतर्क राहाण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय.
Continues below advertisement