Bhandara मधीस पवनी तालुक्यात गो तस्करीचं रॅकेट उघड,4 पशुवैद्यकीय डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात सिरसाळा येथे बळीराम गोशाळा असून तिथं हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मागील दोन महिन्यात या गोशाळेत चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, भंडारा जिल्ह्यातील काही पोलीस स्टेशन अंतर्गत तस्करीसाठी जाणाऱ्या गोधनाची सुटका करून पवनीतील गोशाळेत पाठविले होते. मात्र, 152 जणावरांपैकी 89 जनावरे कत्तल खाण्यात विकल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने, जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी गोशाळेच्या चौकशीचे आदेश दिले होते. पवनीचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष चिलांगे यांना चौकशीत गोशाळा येथील 89 जनावरे परस्पर विकल्याचा तर, काही जनावरे मृत झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत जनावरांचे पोस्टमार्टम न करताच गोशाळा व्यवस्थापनाला बनावट मृत्यू प्रमाणपत्र दिलेची धक्कादायक बाब समोर आली. या प्रकरणी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून पवनी पोलिसात 4 पशु वैद्यकीय डॉक्टरसह गौशाळा चालकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यात तीन महिला संचालकांचा समावेश आहे.