Bhandara : मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल, परराज्यात मागणी घटल्याने दरात लक्षणीय घट
मिरचीचे दर अचानक घसरल्यानं जिल्ह्यातला मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय.... मिरचीवर यंदा चुरडा, मुरडा, बोकड्या या रोगांचा मोठा प्रादुर्भाव दिसून आला. त्यामुळे मिरचीच्या रोपांची आणि पिकाची चांगली वाढ झाली नाही.. परिणामी पिकाचा दर्जा घसरल्याचंही काही ठिकाणी पाहायला मिळालं... साहजिकच परराज्यात जाणाऱ्या मिरचीची मागणी घटली. त्यामुळे गेल्या वर्षी ६५ ते ७० रुपये दर मिळाला असताना यंदा मात्र हा दर अवघा १४ ते २० रुपयांपर्यंत घटला आहे