Bhandara : 3 वर्षांत 18 बालविवाह, भंडाऱ्यात बालविवाह रोखण्यासाठी महिला आणि बालविकास विभागाचा पुढाकार
Continues below advertisement
परभणीनंतर बालविवाहाची दुसरी बातमी भंडारा जिल्ह्यातून आहे. भंडारा जिल्ह्यात मागील ३ वर्षांत झालेत.. १८ बालविवाह झालेत... ही खूप गंभीर बाब आहे म्हणूनच बालविवाह रोखण्यासाठी महिला आणि बालविकास विभागाने पुढाकार घेतलाय... बालविवाह लावणारे आणि त्यात सहभागी होणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा प्रस्ताव त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला होता... त्यामुळे लग्नाचं सभागृह, बँड-वाजंत्री, पत्रिका छपाई करणारे, केटरर्स, फोटोग्राफर यांच्यासह धार्मिक स्थळ, मंदिर येथे विवाह लावून देणारे आणि या विवाहात सहभाग घेणाऱ्या सर्व वऱ्हाड्यांवर आता फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
Continues below advertisement