Bhandara Potholes : भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये खड्ड्यांविरोधात अजित पवार गटाचं आंदोलन

Bhandara Potholes : भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये खड्ड्यांविरोधात अजित पवार गटाचं आंदोलन

भंडाऱ्याच्या तुमसरातील खड्ड्यांविरोधात राज्यातील सत्ताधारी अजित पवार गटाचं आंदोलन

खड्ड्यांमध्ये केक कापून केला राज्य सरकारचा निषेध

नागपूरनंतरची सर्वात मोठी सराफा व्यापारपेठ असलेल्या भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरा मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. विशेष म्हणजे, हा मार्ग मध्यप्रदेशकडं जाणारा आंतरराज्यीय महामार्ग आहे. वारंवार तक्रार करूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण किंवा नगरपालिका प्रशासन याकडं दुर्लक्ष करीत असल्यानं नागरिकांना या खड्ड्यातून मार्ग काढताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. अनेकदा अपघातही घडलेले आहेत. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सरकारमध्ये सहभागी असलेल्या अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनीचं या खड्ड्यांविरोधात तुमसरात आंदोलन केलं. या खड्ड्यांमध्ये केक कापून राज्य सरकार आणि प्रशासनाचा यावेळी निषेध करण्यात आला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola