Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव, दगडफेकनंतर लाठीचार्ज, पोलीस म्हणाले...

Continues below advertisement
अहिल्यानगर शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान दगडफेक झाली, त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हे आंदोलन झाले. सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावर काढलेल्या रांगोळीवरून मुस्लिम समाजाने आक्षेप घेतला होता. यावरून गुन्हा नोंदवून रांगोळी काढणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर काही मुस्लिम लोक कोतला येथे जमा झाले आणि त्यांनी रास्ता रोको केला. पोलिसांनी त्यांना निघून जाण्याची विनंती केली, परंतु ते ऐकत नव्हते. त्यातल्या काही लोकांनी दगडफेक सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून जमावाला पांगवले आणि काही लोकांना ताब्यात घेतले. पुढील कारवाई पोलीस करत आहेत. पोलिसांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. 'त्यातल्या काही लोकांनी जे आहे दगडफेक सुरू करत सुरू केली, त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे आणि जो जमाव आहे तो पांगवलेला आहे आणि त्यानंतर त्यामधील काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे, पुढील कारवाई पोलीस करत आहे,' असे पोलिसांनी सांगितले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola