Manjili karad PC : मी मराठा असल्याने जरांगेंनी मला न्याय द्यावा; वाल्मिक कराडच्या पत्नीचं आवाहन
Manjili karad PC : मी मराठा असल्याने जरांगेंनी मला न्याय द्यावा; वाल्मिक कराडच्या पत्नीचं आवाहन
बीड : मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखसाठी न्याय मागितला, माझ्या नवऱ्यावर अन्याय झाला. मीदेखील मराठा आहे त्यामुळे जरांगेंनी मला न्याय द्यावा अशी मागणी वाल्मिक कराडच्या पत्नी मंजिली कराड यांनी केली. मस्साजोगमध्ये स्टंट केला आणि त्या स्टंटमुळे माझ्या नवऱ्याला अडकवण्यात आलं असा आरोपही त्यांनी केला. यापुढे सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि बजरंग सोनवणेंच्या सगळ्या गोष्टी हळूहळू बाहेर काढणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर मंजिली कराड यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठा असल्याने मला न्याय द्यावा, जरांगेंना आवाहन मंजिली कराड म्हणाल्या की, जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांसाठी न्याय मागितला. संतोष देशमुख माझ्या भावासारखा आहे. पण तो एकटाच मराठा नाही. मीदेखील मराठा आहे. मला न्याय कोण देणार? आता माझ्या नवऱ्यावर अन्याय होत आहे. तुम्ही जसा मराठा समाजाचा आहे असं सांगत देशमुखांसाठी न्याय मागता तोच न्याय मला द्या. न्यायव्यवस्था बळी पडते, मंजिली कराडांचा आरोप वाल्मिक कराडला पोलिस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यावर बोलताना मंजिली कराड म्हणाल्या की, "फक्त एका फोन कॉलमुळे तुम्ही 302, 307 कलम, मोक्का सारखा गुन्हा कसा लावू शकता असं न्यायाधीशांनीही पोलिसांना विचारलं आहे. पण शेवटी न्यायव्यवस्था कुणाच्या तरी हातामध्ये आहे. ती कुणाच्या तरी दबावाला बळी पडली."