Walmik Karad on CID Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी

Continues below advertisement

Walmik Karad: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला वाल्मिक कराडला (Walmik Karad) मंगळवारी रात्री 9.30 वाजता केज येथे आणण्यात आले. रात्री उशिरा येथील न्यायालयासमोर त्यास हजर केले असता न्यायाधीश पावसकर यांनी वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. त्यानंतर रात्री 12.10 वाजता वाल्मिक कराड याला बीडकडे रवाना करण्यात आले.

वाल्मिक कराड हा मंगळवारी सीआयडीसमोर शरण आला. दोन दिवसांपासून तो शरण येण्याच्या चर्चा होत्या. अखेर सोमवारी रात्री अक्कलकोट स्वामींचे दर्शन घेऊन तो सकाळी पुण्यात दाखल झाला व दुपारी सव्वाबारा वाजता सीआयडी मुख्यालयात आल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सीआयडीचे अपर पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी त्याची तीन तास चौकशी केली. त्यानंतर सीआयडीचे पथक वाल्मिक कराडला घेऊन केजकडे रवाना झाले.

न्यायालयात वाल्मिक कराडच्या वकीलांनी कोणता युक्तिवाद केला?

तक्रार ही खंडणीची आहे, पण यात कुठे ही दोन कोटी रुपयाची खंडणी मागितल्याचा उल्लेख नाही. विष्णू चाटे याचा मोबाईल नाशिकमध्ये आहे, तो मिळाला आहे. वाल्मिक कराडच्या ऑफिसमध्ये आल्याचे सांगितले पण कधी बोलावले हे स्पष्ट नाही. आम्हाला राजकीय बळी ठरवले. वाल्मिक कराडवरील 15 गुन्हे पैकी फक्त एक गुन्हा तोही आंदोलनचा आहे. आम्हाला राजकीय गुंतवले. 15 दिवसांच्या पोलीस कोठडीची गरज नाही. राजकीय दबावातून गुन्हा दाखल केला आहे. आरोपी स्वत: हजर झाले आहेत, असा युक्तिवाद वाल्मिक कराडच्या वकीलांनी केला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram