UPSC Success Story | यूपीएससीतील यशवंत, बीडच्या मंदार पत्कीच्या यशाचं गमक काय?
Continues below advertisement
नागरी सेवा परीक्षा 2019 चा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आला झाला आहे. यात बीड येथील महावितरणमध्ये अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेले जयंत पत्की यांचे चिरंजीव मंदार पत्की यांनी देशात 22 क्रमांक मिळवत घवघवीत यश मिळवले आहे.
बीड येथील संस्कार विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मंदार याने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, पुणे येथून पॉलिटेक्निकचे शिक्षण घेतले. त्यानंतर विश्वकर्मा इन्स्टीट्युट पुणे येथून त्याने मॅकनिकल इंजिनियरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर मंदार याने ज्ञान प्रबोधनी पुणे येथून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा 2019 साली दिली होती. या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आणि त्यामध्ये पहिल्याच प्रयत्नात मंदारने अवघ्या 23 व्या वर्षी मोठे यश मिळवले आहे.
Continues below advertisement