Beed : वनविभागापुढे झाडांना वाचवण्याचं आव्हान, झाडांना जीवनदान देण्यासाठी प्रयत्न : ABP Majha
बीड जिल्ह्यातल्या पालवण गावाजवळ असलेल्या सह्याद्री देवराईच्या २ एकर परिसराला आग लागली होती.. या आगीची शेकडो झाडांना झळ बसली होती.. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नसलं तरी आता आगीत होरपळलेल्या या झाडांना जीवदान देण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरु आहेत.. वन विभागाकडून या होरपळलेल्या झाडांना टँकरच्या साह्याने पाणी देण्यात येतंय.. एका दृश्यामध्ये हिरवीगार सह्याद्री देवराई पाहायला मिळतेय.. तर दुसऱ्या दृश्यात आग लागल्यानंतर सह्याद्री देवराईची झालेली अवस्था पाहायला मिळतेय.