Suresh Dhas on Beed Massajog Crime : 'मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी बीडचं पालकत्व घ्यावं'

Continues below advertisement

Suresh Dhas on Massajog Crime: माझ्या बूथ प्रमुखाची हत्या झाली. संतोष देशमुख हा भाजपचा बूथ प्रमुख होता. त्यामुळे मी या प्रकारात जास्त सहभागी आहे. धनंजय मुंडे तुम्ही संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात समर्थन देत आहात का? आणि गोपीनाथ गडावरून हे बोलता? तुम्ही कोणत्या दुनियेत वागताय? तुमची स्टाईल कशी आहे धनु भाऊ? तुम्हाला सिरियसनेस काय आहे, हे गँग ऑफ वासेपूर आहे असल्याची टीका करत भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणावर भाष्य केलंय. 

माधव जाधव प्रकरणात त्याची काय चूक होती. कोठे गुन्हे दखल केले जात आहे? डॉक्टर वर गुन्हा दाखल केला हे खरं आहे का? आता पर्यंत किती प्रकरण झाले? बबन गित्ते खरचं आरोपी होता का? परळीत सांगतो या प्रकरणात किती आरोपी होते, या प्रकरणात मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री लक्ष देणार नाही. धनंजय मुंडे आधी असे नव्हते काय होतास तू काय झालास तू, असे ही आमदार सुरेश धस म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram