ABP News

Suresh Dhas Meet Satish Bhosle Family : आमदरा सुरेश धस यांनी घेतली सतीश भोसलेच्या कुटुंबीयांची भेट

Continues below advertisement

Suresh Dhas Meet Satish Bhosle Family : आमदरा सुरेश धस यांनी घेतली सतीश भोसलेच्या कुटुंबीयांची भेट

Suresh Dhas : भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा कार्यकर्ता सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्याचे अनेक गुन्हेगारी व्हिडिओ समोर आल्यानंतर तो फरार झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्याला प्रयागराज येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. राज्याच्या वनविभागानं ही कारवाई केली. खोक्यानं वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करुन घर बांधल्याचा दावा केला आहे. खोक्या गुन्हेगार आहे म्हणून नव्हे तर त्यानं वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करुन घर बांधल्याचं सरकारनं म्हटलं आहे. वनखात्याच्या जागेत अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या घरावर बुलडोझर चालवण्यात आल्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सतीश भोसले याच्यावर कायद्यानुसार कारवाई व्हावी. पण आमचे घर पाडणाऱ्यांवरही सरकारने कारवाई करावी. सरकारने आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी सतीश भोसले हिच्या बहिणीने केली आहे. यानंतर आता सुरेश धस यांनी देखील कुणाचं घर पाडणं चांगली गोष्ट नव्हे, असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

नेमकं काय म्हणाले सुरेश धस? 

सुरेश धस म्हणाले की, मी आता तिथे चाललो आहे. मी वन खात्याच्या काही लोकांना बोलावलं आहे, त्यांच्याशी मी बोलतो. कोणाचे घर पाडणे ही चांगली गोष्ट नाही. ती ॲक्शन का घेण्यात आली? हे सुद्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मी बोलणार असल्याचे त्यांनी म्हटले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram