Suresh Dhas Dance : यात्रा उत्सवात आमदार सुरेश धस यांचा रांगडा अंदाज Ambedkar Jayanti 2025

आमदार सुरेश धसांचा रांगडा अंदाज; ग्रामदैवताच्या यात्रेत ढोल बडवून लेझीमवर ताल

Anc:सध्या बीड जिल्ह्यात गावोगावी यात्रा उत्सव सुरू आहे. आणि याच यात्रा उत्सवात भाजपाचे आमदार सुरेश धस यांचा रांगडा अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. 

आष्टी तालुक्यातील वाळुंज येथील भैरवनाथाच्या पालखी सोहळ्यात आमदार सुरेश धस सहभागी झाले होते. यावेळी सुरेश धस यांनी पारंपारिक पद्धतीने लेझीम खेळत पालखीत सहभाग घेतला. तर ढोल बडवताना सुरेश धसांचा रांगडा अंदाज पाहायला मिळाला. 

वाळुंज येथील भैरवनाथ देवस्थान सुरेश धस यांचे ग्रामदैवत आहे. प्रत्येक वर्षी आमदार सुरेश धस या यात्रेत सहभागी होत असतात. यंदा देखील मोठ्या उत्साहात यात्रा उत्सव सुरू असून यामध्ये सुरेश धस मनमुराद लेझीम आणि ढोलचा आनंद घेताना दिसून आले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola