Beed Bus Accident : पुणे-नांदेड स्लीपर एसटी बसचा अपघात,अपघातात 6 प्रवासी गंभीर जखमी
बीडच्या लिंबा गणेश गावाजवळ पुण्याहून नांदेड कडे जाणाऱ्या स्लीपर एस टी बसला अपघात झाला असून या अपघातामध्ये सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही बस लिंबागणेश जवळ आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटलेल्या बस थेट शेतामध्ये घुसली आणि यामध्ये हा अपघात झाला.. या बसमधून 25 प्रवासी प्रवास करत होते त्यापैकी सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पाटोदा आणि बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे.. तर पहाटेच्या वेळी चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचं प्रवाशांच म्हणणं आहे..