Satish Bhosale Beed : खोक्याचं 'पार्सल' बीडमध्ये दाखल, माज करणाऱ्या सतीशला धरुन पोलीस स्थानकात नेलं

Continues below advertisement

छत्रपती संभाजीनगर : बीड पोलीस सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. सतीश भोसले उर्फ खोक्याला दोन दिवसांपूर्वी प्रयागराजमध्ये अटक करण्यात आली होती. काल प्रयागराजमध्ये न्यायालयीन प्रक्रिया पार पाडल्यानंतर सतीश भोसलेचा ताबा बीड पोलिसांना मिळाला आहे. बीड पोलीस भोसलेला ताब्यात घेऊन आज पहाटे छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल झाले आहेत.  पोलीस सतीश भोसले उर्फ खोक्याला बीडला घेऊन जातील, अशी माहिती आहे. काल रात्री खोक्याला प्रयागराजमधून महाराष्ट्रात आणलं गेलं आहे. 

बीड पोलिसांनी सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून महाराष्ट्रात आणलं. युवकाला मारहाण केल्या प्रकरणी सतीश भोसले उर्फ खोक्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. खोक्याचे युवकाला मारहाण करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्या फरार झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु करण्यात आला होता. मात्र, तो पोलिसांना सापडत नव्हता. खोक्या फरार झाल्यानंतर काही काळ पुण्यात देखील होता. त्यानंतर तो पुन्हा बीडला जाऊन नंतर प्रयागराजला गेला होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram