Santosh Deshmukh Beed : संतोष देशमुख यांच्या हत्येला 50 दिवस पूर्ण; 50 दिवसांत काय झालं?

बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला ५० दिवस पूर्ण झालेत...यातल्या ७ आरोपींना अटक करण्यात आलीय. पण आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र अजूनही फरारच आहे. कृष्णा आंधळे नेमका कुठे लपलाय किंवा त्याचं नेमकं काय झालं, याचा छडा अजून लागू शकलेला नाहीय. गेल्या चार वर्षांत त्याच्यावर सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे...२०२३ मध्येही त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. धारूर, अंबाजोगाई, आणि केज पोलीस ठाण्यांमध्ये खंडणी, मारामारी, आणि खुनाचे प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आज सीआयडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. आरोपी फासावर लटकत नाहीत तोपर्यंत लढा देत राहणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. अजित पवार यांनी निरोप पाठवला तर त्यांचीही भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola