Beed : संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा , Sandeep Kshirsagar यांची मागणी
Continues below advertisement
बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराची जाळपोळ करण्यात आली होती. या प्रकरणी आज विधानसभेत चर्चा झाली. या प्रकरणाचा मास्टरमाईंड शोधून काढा आणि न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली. या प्रकरणात एसआयटी का स्थापन झाली नाही? असा सवाल शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला, त्यावर सभागृहाची इच्छा असेल तर दोन दिवसांत एसआयटी स्थापन करू, असं फडणवीस म्हणाले. मात्र पोलिसांनी कारवाई केली नाही हा आरोप मात्र त्यांनी फेटाळला. बीडमध्ये पोलिसांवर आरोप केले जात आहेत. मात्र अंतरवाली सराटीत पोलिसांनी कारवाई केली तेव्हा मोठमोठे नेते पोलिसांना टार्गेट करत होते याकडे फडणवीसांनी लक्ष वेधलं.
Continues below advertisement