Ravikant Tupkar Buldhana EXIT Poll : दोन दिवस वाट बघा, बुलढाण्यात शेतकरी - जनता विजयी होणार

Continues below advertisement

Buldhana Lok Sabha Constituency : बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मतदान (Lok Sabha Election 2024)  प्रक्रिया 26 एप्रिल रोजी पार पडली. मतदारांचा कौल मतपेटीत कैद झाला असून त्याचा अंतिम फैसला आता 4 जूनलाच होणार आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांसह मतदारांनाही या निकालाची उत्सुकता लागली आहे. असे असताना मतदानाच्या वेळी सर्व मतदान कक्षांमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मतदान प्रक्रियेचे झालेले व्हिडिओ रेकॉर्डिंग हा मतदान प्रक्रियेची वैधता ठरवणारा एकमेव पुरावा आहे. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रातील व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवावे, अशी मागणी शेतकरी नेते आणि बुलढाणा लोकसभा (Buldhana Lok Sabha Constituency) मतदारसंघातील उमेदवार  रविकांत तुपकर (Ravikant Tupkar)  यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

नेमकं काय म्हणाले रविकांत तुपकर

लोकसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी या संदर्भातील निवेदन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवडणूक आयोगाकडे पाठविले आहे. या निवेदनात नमूद आहे की, मी स्वतः अपक्ष म्हणून 'पाना' या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढविली आहे. 26 एप्रिल 2024 रोजी मतदान पार पडले आहे. मतदानाच्या मतदान कक्षामध्ये मतदान निपक्षपातीपणे, मोकळ्या वातावरणात आणि कायदेशीरपणे पार पडते आहे किंवा नाही हे तपासून पाहण्यासाठी सर्व मतदान कक्षांमध्ये मतदानाच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे, असे निर्देश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram