Raj Thackeray Beed Daura : राज ठाकरेंच्या बीड दौऱ्यादरम्यान पाकिटमारांचा सुळसुळाट
राज ठाकरेंच्या बीड दौऱ्यादरम्यान पाकिटमारांचा सुळसुळाट पाहायला मिळाला... राज ठाकरे आज बीडच्या दौऱ्यावर होते यावेळी गोपीनाथ गडावर गर्दीचा फायदा घेऊन एका व्यक्तीचे वीस हजार रुपये चोरल्यानंतर या चोरानं थेट मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांच्या खिशातच हात घातला, पण राजेंद्र मोटे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी या चोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं...