Prakash Mahajan Nashik : मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे जाणारे राजकीय व्यक्ती म्हणजे गोपीनाथ मुंडे

Continues below advertisement

Gopinath Munde : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा आज दहावा स्मृतिदिन आहे. यानिमित्त देशासह राज्यभरातील लाखो कार्यकर्ते गोपीनाथ मुंडे यांना विनम्र अभिवादन करत आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), यांच्यासह अनेक नेते मंडळींनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स या सोशल मिडिया माध्यमावर म्हटले आहे की,  महाराष्ट्राच्या मातीतील एक असामान्य राजकीय व्यक्तिमत्व, माजी केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी उप-मुख्यमंत्री लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.

राजकारण आणि समाजकारणातील अभ्यासू नेतृत्व : देवेंद्र फडणवीस 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकारण आणि समाजकारणातील अभ्यासू नेतृत्व, लोकहिताच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारे, आमचे नेते, प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक मा. गोपीनाथजी मुंडे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...

भाजपला पळी पंचपात्रापासून ते शेतकऱ्याच्या रुमण्यापर्यंत नेणारा नेता गोपीनाथ मुंडे : प्रकाश महाजन 

मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले की, पळी पंचपात्रापासून ते शेतकऱ्याच्या रुमण्यापर्यंत भारतीय जनता पक्ष नेणारा एकमेव नेता म्हणजे गोपीनाथराव. मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे जाणारे राजकीय व्यक्ती म्हणजे गोपीनाथ राव, अशा शब्दात मनसे नेते प्रकाश महाजन यांनी स्व.गोपीनाथराव मुंडे यांना आदरांजली वाहिली. 

अजित पवारांकडून आदरांजली

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,  महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली! राज्यातील सर्वसामान्य जनमानसासाठी आणि कष्टकरी ऊसतोडणी मजुरांसाठी ते आयुष्यभर झटले. त्यांच्या स्मृतींना वंदन करतो.

आजही तुम्ही ऊर्जा रूपाने आमच्यातच : धनंजय मुंडे

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की,  अप्पा, दहा वर्ष झाली तुम्हाला आमच्यातून जाऊन, पण आजही तुम्ही ऊर्जा रूपाने आमच्यातच आहात. ती ऊर्जा कायम लोकसेवेची प्रेरणा देत राहील... स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब (अप्पा) यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र आदरांजली...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram