Pankaja Munde Beed : पराभवानंतर पंकजा मुंडेंच्या घरी समर्थकांची रिघ; कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

Continues below advertisement

Beed Khasdar, Maharashtra Lok Sabha Election Results 2024 : मराठा आंदोलनामुळे हिंसेची धग बसलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवला. बीड लोकसभेची लढत अतिशय रोमहर्षक झाली. प्रत्येक फेरीनंतर अन् प्रत्येक तासाला चित्र बदल होते. बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा विजय होईल, असा अनेकांचा अंदाज होता. त्याला कारणेही तशीच होती. पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी आमदारांचा फौजफाटा होता. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजप आणि राष्ट्रवादीचे आमदार असतानाही पंकजा मुंडे यांना आघाडी घेता आली नाही. परळीचा अपवाद वगळता पंकजा मुंडे यांना कुठेही मोठी आघाडी घेता आली नाही.

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या मागे सहा आमदारांचा फौजफाटा होता. धनंजय मुंडे  यांनी पंकजा मुंडेसाठी जिवाचं रान केले होते, त्यामुळे भाजपला हा विजय सहज मिळेल असं म्हटले जात होते. पण सहा आमदार पाठिशी असतानाही पंकजा मुंडे यांच्या पदरी निराशाच झाली. लोकसभेतील पराभवानंतर भाजप अलर्ट मोडवर गेलेय. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर सहा आमदार अलर्ट मोडवर गेल्याची चर्चा आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram