OBC Reservation Protest | मराठवाडा मुक्तीदिन कार्यक्रमात Sambhajinagar मध्ये घोषणाबाजी, 3 जण ताब्यात

Continues below advertisement
आज मराठवाडा मुक्तीदिन कार्यक्रमात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला. संभाजीनगर येथे मुख्यमंत्री फडणवीस भाषण करत असताना अचानक एक आंदोलक उभा राहिला आणि सरकारविरोधी घोषणा देऊ लागला. पोलिसांनी त्याला कार्यक्रमातून बाहेर काढत ताब्यात घेतले. मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावरून सांगितले की, "अशाप्रकारे मराठवाडा मुक्तीदिन कार्यक्रमात घोषणा देणं हा हुतात्म्यांचा अवमान आहे." मुख्यमंत्र्यांसमोर घोषणा देणाऱ्या आंदोलकाचे नाव रामभाऊ पेरकर असून, पेरकरसह पोलिसांनी एकूण तीन जणांना ताब्यात घेतले आहे. ओबीसींवर अन्याय होत असल्याच्या मुद्द्यावरून हा गोंधळ झाला. या घटनेमुळे मराठवाडा मुक्तीदिन कार्यक्रमात तणाव निर्माण झाला. ताब्यात घेतलेल्या तिन्ही आंदोलकांवर पुढील कारवाई करण्यात येत आहे. ओबीसी आरक्षणाच्या मागणीवरून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola