Manoj Jarange Hunger Strike Special Report : मनोज जरांगेंच्या उपोषणाला गावकऱ्यांचा विरोध का ?

Continues below advertisement

Manoj Jarange Hunger Strike Special Report : मनोज जरांगेंच्या उपोषणाला गावकऱ्यांचा विरोध का ? देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) निकालाचा दिवस अखेर उजाडला असून प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्ते आणि नेतेमंडळी कामाला लागली आहे. दुसरीकडे निवडणूक निकालानंतर मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणास बसणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी तुर्तास आपला निर्णय बदलला आहे. निवडणूक निकालानंतर मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणासाठी बसणार होते. मात्र, अंतरवाली सराटी गावातूनच त्यांना विरोध होत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे गावातील उपसरपंचांसह 70 जणांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जरांगेंच्या आंदोलनामुळे गावातील जातीय सलोखा बिघडत असल्याचे म्हटले. त्यानंतर, आता जरांगे यांनी तुर्तास आपले आंदोलन स्थगित केले आहे.  मनोज जरांगे यांच उद्याच उपोषण स्थगित करण्यात आलं असून  ते 8 जून रोजी उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे, आचारसंहितेच्या नावाखाली प्रशासनाकडून खोटे गुन्हे दाखल केले जातील, म्हणून सावध भूमिका घेत जरांगेंनी उद्याचं आंदोलन स्थगित केल्याची माहिती आहे. तसेच, अंतरवाली सराटी येथील ग्रामस्थांनी केलेल्या विरोधामुळेही हा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू झाली होती, 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram