Beed : अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांसमोर नवं संकट, सर्व्हर डाऊन झाल्यानं अर्ज दाखल करण्यात अडचणी
Continues below advertisement
यंदा झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता.. मात्र परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासही हिरावल्याने शेतकरी हवालदिल झालाय.. ऐन सणासुदीच्या काळात ओढावलेल्या संकटापुढे पिकविमा हाच एक पर्याय आता शेतकऱ्यांसमोर आहे.. मात्र पीकविम्याच्या ऑनलाईन अर्जासाठीही शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय.. ज्या शेती पिकाचा पाीकविमा उतरवला आहे त्या पिकाचं नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत ऑनलाईन अर्ज दाखल करणं गरजेचं आहे. मात्र सर्वर बंद असल्यामुळे तक्रार नोंदवताना अडचणी येतायत...त्यामुळे 72 तासांचा कालावधी उलटून गेला तर पुढे करायचं काय असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय..
Continues below advertisement