Mahadev Munde Beed Case : महादेव मुंडेंच्या पत्नीची एबीपी माझावर EXCLUSIVE प्रतिक्रिया, काय केली मागणी?
Mahadev Munde Beed Case : महादेव मुंडेंच्या पत्नीची एबीपी माझावर EXCLUSIVE प्रतिक्रिया, काय केली मागणी?
पत्नीने पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवले
पोलिसांनी परळी शहर पोलिस ठाण्यात या सगळ्या संदर्भात हत्येचा गुन्हा दाखल केला. पण आरोपी कोण हे काही निष्पन्न होत नव्हते. दोन अडीच महिने वाट पाहिल्यानंतर पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवले, मेहूणा सतीश फड यांनी तत्कालीन एसपींकडे या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करावा अशी विनंती केली. मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक , पोलिस अधीक्षक यांच्याकडे अर्ज केले. मात्र न्याय मिळाला नाही.
सुरेश धसांनी प्रकरण उजेडात आणलं
पुढे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आणि पोलीस तपासात कोणाचा दबाव होता, आरोपी बदलण्यासाठी कोणी दबाव टाकला असं सांगत वाल्मिक कराडच्या मुलाच्या आजूबाजूला महादेव मुंडेंचे खुनाचे आरोपी फिरत असल्याचा दावा केला. सुरेश धसांनी हे प्रकरण पुन्हा उजेडात आलं. याच प्रकरणात आमदार धस यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेतली आहे आणि हा तपास एलसीबीकडे वर्ग करण्याची विनंती केली.
पोलिसांनी आरोपींचा तपास केलाच नाही
यातील धक्कादायक बाब म्हणजे मुंबईतील सायबर तज्ज्ञांनी या सगळ्या प्रकरणात डाटा वेगळा करून 150 मोबाईल काढले, त्यातून सहा मोबाईल क्रमांक काढले. मात्र बीड पोलिसांनी या मोबाईलची साधी चौकशीही केली नाही असा आरोप धस यांनी केला. शिवाय तत्कालीन पोलिस कर्मचाऱ्यांचे मोबाईल डाटा तपासल्याची विनंती केली आहे.